About Us

बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर ललित वैचारिक, प्रबोधनात्मक विचारांना प्रकाशीत करून प्रसारीत करणाऱ्या भारतातील नामांकित प्रकाशन संस्थांमध्ये सुधीर प्रकाशन ही एक अग्रणी प्रकाशन संस्था आहे. मुळात शिक्षकाचा पिंड असलेल्या शालिग्राम गवळी (गुरुजी) ह्यांनी सुधीर प्रकाशन या नावाने ही संस्था काढली.

मराठी, हिन्दी, इंग्रजी ह्या तीन्ही भाषेतून सुधीर प्रकाशन थोर पुरूषाचे चरित्रे, आत्मचरित्रे, कथा, कविता, कादंबरी, ललित, वैचारिक विचारांची पुस्तके त्याचबरोबर बाल कुमारांसाठीही संस्कारित ग्रंथ संपदा सुधीर प्रकाशनामार्फत प्रकाशीत, प्रसारित व वितरीत केले जाते. इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाज विज्ञान आणि विज्ञान यामध्ये तज्ञ असलेल्या लेखकांची पुस्तके प्रकाशीत केली जातात. आज विदर्भात नावाजलेल्या सुधीर प्रकाशन ह्या संस्थेचे मुख्यालय गणेश नगर, बोरगांव (मेघे), वर्धा येथे सुधीर शालिग्राम गवळी व उत्कर्ष सुशीर गवळी यांचेकडे प्रकाशनाचे व्यवस्थापनाची संपुर्ण जबाबदारी आहे.